सुराणानगरात चोरट्यांनी डॉक्टरांचा फ्लॅट फोडला

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः चप्पल ठेवण्याच्या रॅकमधून घराची चावी काढत चोरट्यांनी घर साफ केल्याची घटना सुराणानगर किया शोरूमजवळ घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. अभिषेक राजेश रानडे रा. सुराणानगर पाठक मॅथ अकॅडमी, किया शोरूमजवळ यांनी फिर्याद दिली. 
फिर्यादीनुसार, ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी नसताना अज्ञात चोरट्याने चप्पल ठेवण्याच्या स्टॅन्डजवळ ठेवलेली चावी घेत घर उघडले. घरात ठेवलेले घड्याळी, रोख रक्कम असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास जिन्सी पोलिस करीत आहेत.